विक्रीसाठी आणलेल्या अवैध ४१ तलवारीसह इसमास अटक: अपर पोलीस अधीक्षक पथकाची कारवाई; नांदुऱ्यात खळबळ 

नांदुरा:  शहरात विक्रीसाठी आणलेल्या अवैध 41 तलवारींसह 33 वर्षीय इसमास पोलीस विभागाने गजाआड केल्याची घटना शहरातील शाहीन कॉलनी येथे उघडकीस आली. हे कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने व एलसीबी पथकाने संयुक्तरीत्या केली. या कारवाईमुळे नांदुऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

नांदुरा:  शहरात विक्रीसाठी आणलेल्या अवैध 41 तलवारींसह 33 वर्षीय इसमास पोलीस विभागाने गजाआड केल्याची घटना शहरातील शाहीन कॉलनी येथे उघडकीस आली. हे कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाने व एलसीबी पथकाने संयुक्तरीत्या केली. या कारवाईमुळे नांदुऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

         खामगाव येथील अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहरातील शाहीन कॉलनी येथील रहिवाशी शेख वसीम शेख सलीम 33 हा शहरांमध्ये अवैधरीत्या तलवारी विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाली. यावरून आपण पोलीस अधीक्षक पथकातील सपोनि सचिन पाटील,  पोकॉ. शिवशंकर वायाळ तसेच स्थानिक गुन्हे शाखा विभागातील पीएसआय अविनाश जायभाय, पोहेकॉ. चांद शेख, गणेश पाटील यांनी 20 ऑगस्ट रोजी सापळा रचून आरोपी शेख वसीम शेख सलीम याचे राहते घर शाहीन कॉलनी येथे छापा मारला असता आरोपी हा पांढऱ्या पोतडीमध्ये त्याच्या मोटरसायकल क्रमांक एम एच 28 बी एन 22 77 वर अवैधरित्या विक्रीकरिता तलवारी घेऊन जात असताना मिळून आला. यावेळी पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील पांढऱ्या पोतडीच्या लांब गटातील 41 धारदार तलवारी जप्त करण्यात आल्या तसेच दुचाकी सुद्धा जप्त करून आरोपीस ताब्यात घेऊन नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये कारवाईसाठी नेण्यात आले. नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस स्टेशनचे ठाणेदार करीत आहेत. कारवाईची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना देण्यात आले यावेळी 20 ऑगस्ट च्या रात्री 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नांदुरा पोलीस स्टेशन मध्ये पत्रकार परिषद घेऊन अपर पोलीस अधीक्षक पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक व नांदुरा पोलिसांच्या संयुक्त कारवाईबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »