एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये;  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश 

वाशिम : शेतकरी बांधवांनी धीर सोडू नये. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे निर्देश राज्याचे कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी पालकमंत्री  भरणे यांनी २० ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण,उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसीलदार प्रतिक्षा तेजनकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिता महाबळे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी यावेळी रिसोड तालुक्यातील महागाव, बाळखेड,वाकद ,शेलूखडसे, पिंपरखेड,मसलापेन या गावांना, मालेगाव तालुक्यातील राजुरा या गावाला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानाची पाहणी केली व शेतकरी बांधवांशी संवाद साधून त्यांची व्यथा जाणून  घेतली.   पालकमंत्री  भरणे म्हणाले, प्रत्येक नुकसानाची तपशीलवार नोंद घ्यावी.  नुकसानभरपाई व मदत त्वरित मिळवून दिली जाईल .अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे, घरांचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देत एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये,असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. पाहणी दरम्यान लोकप्रतिनिधी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »