गंगापूर : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बिस्कीट आणण्यासाठी गावात जाणाऱ्या बारा वर्षीय सिध्दार्थ विजय चव्हाण या शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना मुद्देश वाडगाव शिवारात १४ ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेच्या तीन दिवसांनंतर सोमवार, 18 ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास दुसऱ्या एका घटनेत सिध्दार्थचा चुलत भाऊ स्वप्निल संजय चव्हाण (२२ वर्ष), रा.मुद्देश वाडगाव याचा मृतदेहही मुद्देश वाडगाव शिवारातील विहिरीत आढळला.

मयत सिद्धार्थचा चुलत भाऊ स्वप्निल संजय चव्हाण हा शनिवार, 16 ऑगस्ट रोजी सकाळी भावासह शेतात गवत आणण्यासाठी गेल्यापासून बेपत्ता होता. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास गावातील संतोष गंगाधर चव्हाण यांच्या गट क्रमांक १८ मधील शेतात स्वप्निलचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या घटना एकमेकांशी संबंधित आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, सिध्दार्थचा खून त्याचा चुलत भाऊ स्वप्निलने करून मृतदेह विहिरीत टाकल्याची चर्चा परिसरात दबक्या आवाजात सुरु आहे. या खुनाच्या आरोपात आपण सापडले जाऊ, या भीतीनेच स्वप्निलने आत्महत्या केल्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेसह गंगापूर पोलिस करीत आहेत.