‘दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या’  : महायुतीतील कलंकित मंत्र्यांवर उबाठाचा ‘वार’

बुलढाणा :  महायुती सरकारमधील बेताल वक्तव्य करणारे तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात  महाराष्ट्र गीताने  झाली. कलापथक कलाकारांनी ‘दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या’ अशा गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. 

बुलढाणा :  महायुती सरकारमधील बेताल वक्तव्य करणारे तसेच भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या कलंकित मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी ‘जनआक्रोश’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात  महाराष्ट्र गीताने  झाली. कलापथक कलाकारांनी ‘दोन दिवसाची दुनिया पाहू द्या… आमच्या कष्टाचा आम्हाला खाऊ द्या’ अशा गीतांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. 

      यावेळी आ. सिध्दार्थ खरात आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, हे शासन फसवेगिरी करून सत्तेवर आलेले आहे. खोटे आमिष देऊन आलेले आहे. महाराष्ट्रातील मंत्री, आमदार यांनी प्रगती, विकास यावर काम करायच सोडून मंत्री काय करतात हे जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. कृषी मंत्री कोकाटे रमी खेळतो, मग म्हणतो शासन भिकारी आहे. सुसंस्कृत महाराष्ट्राला थोर परंपरा लाभलेली असताना  महाराष्ट्रातील मंत्री कलंक लावण्याचे काम करत आहेत.शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम करून हे शेतकरी विरोधी सरकार खाली खेचण्यासाठी आगामी काळात हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. उबाठा शिवसेनेच्या प्रवक्ता ॲड.जयश्री शेळके म्हणाल्या आपले महाराष्ट्र राज्य महान आहे हे आपण देशात अभिमानानाने सांगतो. त्याच  राज्याचे मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकतात, मंत्री आईच्या नावाने डान्सबार चालवतात. कृषी मंत्री ऑनलाईन रमी खेळतात. सत्ताधारी पक्षाचे आमदार सर्व सामान्य माणसावर “बॉक्सिंग स्कील” दाखवत मारहाण करत, कॅन्टीन केसरी म्हणून मिरवतात. तरी देखील राजीनामे घेतले जात नाहीत. ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्या म्हणाल्या. तर जिल्हाप्रमुख  जालींधर बुधवत म्हणाले, शेतकऱ्यांनी न मागता  दोन लाख रुपयांची कर्जमाफी देणारे उद्धव ठाकरे हेच एकमेव शब्द पाळणारे नेते आहेत. शिवसेना ही कायम समाजासोबत राहत आलेली आहे. कुटुंबप्रमुख म्हणून  उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाबाबत आदेश दिले आणि आज राज्यभर हा वनवा पेटत आहे. मायबाप शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह सामान्यांचे प्रश्न जैसे थे असताना राज्यातील महायुती  सरकारच्या मंत्र्यांनी बेताल वक्तव्यसहित भ्रष्टाचाराचा कलंक गाठला आहे.  अघोरी पूजेचे थोतांड मांडणारे मंत्री भारत गोगावले,  ज्यांच्या घरातून पैशांच्या बॅगांचे व्हिडिओ व्हायरल झाले ते मंत्री संजय शिरसाट आणि कळस म्हणजे गृहराज्यमंत्री असतानाही ज्यांच्या आईच्या नावाने असलेल्या बारमध्ये पोलिसांनी कारवाई केल्यानंतर  पितळ उघड पडलेले  मंत्री योगेश कदम  यांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. केवळ सत्ता टिकवण्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस हे हतबल झाल्याचे दिसून येत असल्याचे ते म्हणाले. यावेळी महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदा बढे यांनीही समायोचित विचार व्यक्त केले. आंदोलनानंतर  जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  

हे देखावे ठरले लक्षवेधी

रमी खेळणारा कृषी मंत्री , गृहराज्यमंत्र्यांच्या कुटुंबाचा डान्सबार , पैशाचा बॅगा शेजारी ठेऊन बसलेला मंत्री, अघोरी पूजा करणारा मंत्री ,  सामान्यांना ठोसा मारणारा लोकप्रतिनिधी अशा एकाहून एक प्रतिकात्मक जिवंत देखावे या आंदोलनात सादर करण्यात आले. हे देखावे लक्षवेधक ठरले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »