बदनापूर : तालुक्यात रोजगार निर्मितीसह विकासाला चालना देण्यासाठी बदनापुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे केली आहे.

बदनापूर : तालुक्यात रोजगार निर्मितीसह विकासाला चालना देण्यासाठी बदनापुर येथे औद्योगिक वसाहत स्थापन करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या कडे केली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना पदाधिकारी बैठकीनिमित्त मंत्री सामंत आले असता जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी उद्योगमंत्र्यांची भेट घेऊन बदनापुरच्या रखडलेल्या औद्योगिक विकासाबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी शिवसेना उपनेते, विधान मंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष आ.अर्जुनराव खोतकर, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, खा. राहुल शेवाळे युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर , फेरोजलाला तांबोळी,ॲड.सुनील किनगावकर,
ए. जे .बोराडे, ॲड.भास्कर मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भाऊसाहेब घुगे यांनी बदनापुरचा अनुशेष भरून काढण्या बाबत ना.सामंत यांच्याशी चर्चा करतांना सांगितले की, बदनापुर तालुका निर्माण होऊन 33 वर्षे उलटली तरी अद्याप ही औद्योगिक वसाहत स्थापन झाली नसल्याने तालुक्यातील युवकांना रोजगारासाठी जालना आणि छत्रपती संभाजी नगर कडे धाव घ्यावी लागते. असे भाऊसाहेब घुगे यांनी उद्योग मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तथापि बेरोजगारांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा तसेच नव उद्योजकांना उद्योग उभे करता यावे यासाठी बदनापुर येथे जलदगतीने औद्योगिक वसाहत स्थापन करावी अशी मागणी भाऊसाहेब घुगे यांनी केली. यावेळी शिवसेनेचे बदनापुर तालुकाध्यक्ष कल्याणराव अवघड ,तालुका संघटक भगवानराव मदन, विधानसभा संघटक कैलास दुधानी युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर पाटील जुंबड, प्रवीण पाटील फुके, तालुका संघटक अमोल दाभाडे, शहर प्रमुख अंबादास कोळसकर, महिला आघाडी तालुका संघटक छायाताई जऱ्हाड, युवासेना विभाग प्रमुख रामभाऊ दराडे ,सोशल मीडिया प्रमुख देवा ढाकणे आदींची उपस्थिती होती.
