Pune Rave Party News: पुणे शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात ड्रग्स, दारू आणि हुक्का मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पार्टीत रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर देखील सहभागी होते.

पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर मध्यरात्री पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या छाप्यात ड्रग्स, दारू आणि हुक्का मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पार्टीत रोहिणी खडसे यांचे पती आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर देखील सहभागी होते.
पार्टीतून ७ जण ताब्यात
कारवाईदरम्यान एकूण ७ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये ३ महिला आणि ४ पुरुषांचा समावेश आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासोबत त्यांचा एक मित्र आणि तीन महिला या पार्टीत सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
वैद्यकीय तपासणीसाठी ससूनमध्ये हलवले
सर्व संशयितांना वैद्यकीय चाचणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पार्टीदरम्यान मद्यपान, हुक्का आणि अमली पदार्थांचे सेवन सुरू होते, याचा प्राथमिक अंदाज आहे.
राजकीय संबंधामुळे प्रकरणाला कलाटणी
या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. राजकीय नेत्याच्या नातेवाइकाचा सहभाग समोर आल्याने याप्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे.
