युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्यावरून शेतकऱ्यांत संताप: कृषी सेवा केंद्रावर पंचनामा कारवाईची मागणी

माहोरा : कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माहोरा, जाफ्राबाद परिसरात काही कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. युरिया खताचा साठा असूनही शेतकऱ्यांना खत देण्यास नकार देत असून युरियाची जादा दराने विक्री केली जात आहे. 

माहोरा : कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माहोरा, जाफ्राबाद परिसरात काही कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत. युरिया खताचा साठा असूनही शेतकऱ्यांना खत देण्यास नकार देत असून युरियाची जादा दराने विक्री केली जात आहे. 

     माहोरा येथील रामेश्वर कृषी सेवा केंद्रावर याच संदर्भात कृषी अधिकारी कस्तुरे यांनी अचानक छापा टाकत शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने पंचनामा केला. या छाप्यात हे धक्कादायक वास्तव समोर आले की, केंद्राकडे साठा असूनही वडाळा येथील रमेश लक्ष्मण सोळंके, हर्षल जाधव, विठ्ठल सोळंके, अभिजित थारेवाल यांना युरिया खत विक्री नाकारण्यात आली होती.शेतकऱ्यांच्या मते, या केंद्राचा मालक जाणीवपूर्वक खत लपवून ठेवतो आणि नंतर तीव्र मागणीच्या काळात जादा दराने विकतो. कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्राचा परवाना तत्काळ निलंबित करून योग्य ती कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तालुका कृषी अधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांनी याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे. जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असून कोणत्याही दुकानदारांनी साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा निर्माण करू नये, असे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रभाकर बनसावडे यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »