जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या परिपत्रकाची वंचितने केली होळी; विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी गायरान जमीनीवरील अतिक्रमणे काढून टाकण्याच्या परिपत्रकाची होळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोमवार, 21 जुलै रोजी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर करण्यात आली. परिपत्रकाची होळी केल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांसह जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

शासकीय गायरान जमीनीवरील अतिक्रमण सरसगट काढून टाकण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 17 जुलै रोजी काढले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गायरान अतिक्रमण धारक नागरिक बेचैन झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या या अध्यादेशाची वंचित बहुजन आघाडीच्या वतीने होळी करण्यात आली. विभागीय आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, जिल्ह्यातील गायरान जमीनीवर प्रशासनाने रमाई आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, शबरी आवास योजना अश्या घरकुल योजने अंतर्गत घरे बांधण्याचा घाट घातला आहे. शासकीय गायरान जमीनीवर वर्षानूवर्ष अतिक्रमण करुन राहणाऱ्या भूमीहीन नागरिकांना जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांच्या आदेशाने बेघर करणार आहे का असा सवालही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, शहराध्यक्ष संदीप जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, युवा जिल्हा महासचिव सतीश शिंदे, शहर महासचिव भगवान खिल्लारे, जिल्हा महासचिव मिलिंद बोर्डे, प्रसिद्धी प्रमुख भाऊराव गवई, नितीन भुईगळ, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, गणेश खोतकर, सुभाष कांबळे, प्रविण जाधव, शेख युनुस पटेल, भय्यासाहेब जाधव, रवि रत्नपारखे, एस पी मगरे, राजाराम घुसाळे, प्रभाकर घाटे, विजय घाटे, योगेश घाटे, सुधाकर घाटे आदींची उपस्थिती होती. 

हिवाळी अधिवेशनात काढणार मोर्चा

जिल्ह्यातील गायरान जमीनी अतिक्रमण धारकांच्या नावावर करण्यात याव्यात या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी येत्या हिवाळी अधिवेशनात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली विधी मंडळावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष योगेश बन यांनी यावेळी दिली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »