परभणी : आंगलगाव तांडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा सोमवार, 21 जुलै रोजी पालकमंत्री बोर्डीकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला.

जिंतुर तालुक्यातील आंगलगांव तांडा गावातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कनिराम दिरा पवार, मिठु राठोड, पंढरीनाथ जाधव, सुर्यभान राठोड, सिताराम जाधव, गजानन चव्हाण, संतोष राठोड, राजेश जाधव, राजेश पवार, अजय राठोड, गणपत राठोड, विकास जाधव, उध्दव राठोड, जयदीप जाधव, किरण जाधव, रोहित चव्हाण, राहुल राठोड, अक्षय राठोड, बबन राठोड, मधुकर जाधव आदींनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आंगलगांव तांडा येथील कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे जिंतुर तालुक्यात भाजपची ताकद वाढली आहे. या प्रवेश सोहळ्यास माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामिण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, जिंतुर तालुकाध्यक्षा संगिता जाधव, आंगलगांव तांडाच्या सरपंच आदी उपस्थित होते.