बुलढाणा : राज्यात लोकप्रतिनिधींची गुंडागिरी वाढली असून, जिथे कायदा बनतो तिथेच पायदळी तुडवला जातो. सामान्य नागरिकांच्या आशा देखील तेव्हाच तुटतात. विश्वासाने सत्तेत बसवलेल्या नेत्यांना भविष्यात घरी बसवायचे आहे, आता लोकप्रतिनिधींकडून होणारी गुंडगिरी जनता सहन करणार नाही, जिथे अन्याय होईल त्या विरोधात आम्ही उभे राहू, असे मत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे एएमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले. याशिवाय, आ. संजय गायकवाड यांच्या कॅन्टीन मॅनेजर मारहाण प्रकरणानंतर टीका केल्याने आ. संजय गायकवाड यांनी ‘इतना मारुंगा’ या वक्तव्याचे आव्हान स्वीकारून आपण बुलढाण्यात येऊन प्रतिउत्तर दिल्याचे जलील म्हणाले.

बुलढाणा शहरात प्रवेश सोहळ्यानिमित्त जनता चौक भागात आयोजित कॉर्नर सभेत रविवार, २० जुलै रोजी ते बोलत होते. स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा शहरात पक्ष बदलाचे वारे पाहायला मिळत आहे. दरम्यान, बुलढाणा शहरातील मुस्लिमबहुल भागातील अनेक कार्यकर्त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश घेतला. याप्रसंगी, कॉर्नर सभेत जलील यांनी कार्यकर्त्यांना व जनतेला संबोधित केले. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाण घटनेवर इम्तियाज जलील यांनी हल्लाबोल केला होता. यानंतर जलील यांच्या वक्तव्या विरोधात आमदार संजय गायकवाड यांनी तुम्ही त्या हॉटेलचे कंत्राट घेऊन दाखवा, या वेटरला तर दोनच घुसे मारले आहेत, तुम्हाला एवढा मारेल की तुम्ही हॉटेल चालवायच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही, यानंतर ‘जगह तुम्हारी, वक्त तुम्हारा असे म्हणत जलील यांनी आ.गायकवाड यांचे आव्हान स्वतच स्वीकारले होते.
सभेपूर्वी दिला पोलिसांना शब्द
सभेला येण्यापूर्वी बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने मला विनंती करून, आयोजित कार्यक्रम पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु, यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही असा शब्द मी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना दिल्याचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले.