dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

पत्रकारांसाठीच्या विविध योजनांच्या जाचक अटीमध्ये सुधारणा करा; जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे मागणी

जालना : महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीसह विविध योजनांच्या अटी आणि नियम अत्यंत जाचक असल्याने, त्यामध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

जालना : महाराष्ट्र शासनाच्या पत्रकारांसाठी असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीसह विविध योजनांच्या अटी आणि नियम अत्यंत जाचक असल्याने, त्यामध्ये सुधारणा कराव्यात, अशी मागणी जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. 

      यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हा माहिती अधिकारी अरूण सूर्यवंशी यांच्यामार्फत जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने एक निवेदन पाठविण्यात आले आहे. मराठी पत्रकार परिषदेने पत्रकारांच्या विविध मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याची दखल घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्याची तयारी दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पत्रकार संघटनांना सुधारणा सुचविणार्‍या मागण्या पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाने विविध योजनेतील नियमात काय काय बदल अपेक्षित यासंदर्भात एक निवेदन देण्यात आले आहे. 

या निवेदनावर जालना जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष फकिरा देशमुख, कार्याध्यक्ष किशोर आगळे, जिल्हा सरचिटणिस नारायण माने, उपाध्यक्ष अभयकुमार यादव, दिनेश जोशी, कोषाध्यक्ष धनसिंह सूर्यवंशी, चिटणिस शेख मुसा, जिल्हा कार्यकारीणी सदस्य मोहनराव मुळे, गणेश औटी, अशोक शहा, सर्जेराव गिर्‍हे, धनंजय देशमुख, संतोष सारडा आदींची नांवे आहेत.

 या सुधारणांची मागणी 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेसाठी वयाची अट ५८ वर्षे करावी आणि अनुभवाची अट २५ वर्षे करावी, सलग तीस वर्षे सेवा ही अट रद्द करण्यात यावी. कारण श्रमिक पत्रकारांना नोकरी बदलताना काही दिवसाचा तरी खंड घ्यावा लागतो. त्यामुळे आयुष्यभर पत्रकारिता करणारांची देखील ३० वर्षे सलग सेवा होत नाही. यामुळे अनेक पत्रकार या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे सलग सेवेची अट रद्द करावी. एक वर्षापर्यंत खंड पडलेला असला तरी ती सलग सेवा गृहित धरावी, ज्यांच्याकडे विनाखंड, सलग ३० वर्षे अधिस्वीकृती पत्रिका आहे आणि ज्यांचे वय ५८ वर्षे आहे, अशा सर्व पत्रकारांना सन्मान योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top