dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अदिती अर्बन व शिक्षक भारतीचा उपक्रम; रविवारी शेगाव येथे विद्यार्थ्यांचा गुणगौरव

बुलढाणा : अदिती अर्बन को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व  बुलढाणा जिल्हा शिक्षक भारतीच्यावतीने संतनगरी शेगाव येथे रविवार 15 जून रोजी सकाळी 10 वाजता  शैक्षणिक सत्र 2024 – 2025 मध्ये एसएससी व एचएससी बोर्ड परीक्षा इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत विद्यालय व महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

शेगाव येथील जिजामाता चौक, खामगाव रोड स्थित अदिती अर्बन पतसंस्थेत सकाळी 10 वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अदिती अर्बन को – ऑप. क्रेडिट सोसायटीचे संस्थापक तथा शिक्षक भारतीचे राज्य संघटक सुरेश देवकर यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
Scroll to Top