dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची फसवणूक करणाऱ्या दोघांना नाशिक जिल्ह्यातून अटक;  बुलढाणा पोलिसांची कामगिरी 

बुलढाणा : शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची

फसवणूक करून १२ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या चोरट्यांना नाशिक जिल्ह्यातून येवला येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी शोध मोहीम राबवून ही कामगिरी केली. 

बुलढाणा : शहरातील सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची फसवणूक करून १२ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या चोरट्यांना नाशिक जिल्ह्यातून येवला येथून अटक करण्यात आली आहे. बुलढाणा पोलिसांनी शोध मोहीम राबवून ही कामगिरी केली. 

 शहरालगत असलेल्या सुंदरखेड येथील रहिवासी व सेवानिवृत्त मुख्याध्यापक बंडू चव्हाण (वय ७९) हे एका वैयक्तिक कामानिमित्त ७ एप्रिल रोजी कारंजा  चौकात आले होते. एका स्वीटमार्टमध्ये गेले असताना त्यांना मध्यमवयीन एक व्यक्ती भेटला. त्याने मंदिराचा पत्ता विचारत संवाद सुरू केला. नंतर ‘कानमंत्र’ देतो असे भावनिक आवाहन करून त्याने चव्हाण यांना विश्वासात घेतले. त्याच्या सूचनेनुसार, चव्हाण यांनी हातातील सोन्याची अंगठी आणि खिशातील १०० रुपयांची नोट एका पांढऱ्या रुमालात ठेवली. त्या रुमालात गुंडाळून तो रुमाल पुढे घेऊन जाण्यास सांगत मागे वळून पाहू नका, असे बजावले.

काही वेळाने शंका आल्याने चव्हाण यांनी रुमाल उघडून पाहिला असता, अंगठी गायब होती. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रवी मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथे शोध मोहीम राबवली. आरोपी अमजद नवाब मदारी (वय ३७) आणि अंसार उस्मान मदारी (वय ३९) या दोघांना अटक करून त्यांच्याकडून १२ ग्रॅमची सोन्याची अंगठी जप्त केली आहे. आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top