अकोला : विदर्भातील सिंचनाचे ९० रखडलेले प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण होतील. त्यातील सर्वात महत्त्वकाक्षी असलेला वैनगंगा, नळगंगा प्रकल्प हा देशातील अजूबा असणार आहे. या प्रकल्पातून बुलडाणा, वाशिम जिल्ह्यापर्यंत आणणार आहे. त्या माध्यमातून अकोला, वाशिम, बुलढाणा यांसह विदर्भातील १० लाख एकर शेती सिंचनाखाली आणण्याचे काम या एका योजनेतून होणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील शेती कायम स्वरुपी ओलिताखाली आणू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.

अकोला जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार रविंद्र चव्हाण, आमदार हरिष पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक, आमदार श्याम खोडे यांची प्रमुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की, अकोल्यातली काटीपाटी बॅरेज पुनरुज्जीवीत केला असून ५०० कोटी रुपयांचे काम या ठिकाणी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रिसोड शहरासाठी वाढीव पाणी आरक्षण आणि मालेगाव शहर पाणी योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे अकोलाच नाही, तर वाशिम जिल्ह्याच्या विकासावरही काम सुरू असल्याचे वक्तव्य यावेळी फडणवीस यांनी केले.
भुयारी गटारसाठी ३० टक्के निधी राज्य शासन देणार
अकोला शहरात ६५० कोटी रुपयांची भुयारी गटार योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ३० टक्के निधी महापालिकेने द्यावयाचा आहे. मात्र, महापालिकेकडे एवढा निधी उपलब्ध नसल्याने तोही निधी राज्य शासन देणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.
विमानसेवेला आश्वासनाचे डोस
मुख्यमंत्री आज अकोल्यातील विमानसेवा सुरू करण्यावर मोठी घोषणा करतील, अशी आशा अकोलेकरांना होती. मात्र, अमरावतीचे झाले आता अकोल्याचाच क्रमांक आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे यंदाही अकोलेकरांच्या आशेवर पाणी फेरल्याचे चित्र दिसून आले.