dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

जालना कृषी बाजार समितीत बोकडांचा बाजार भरविल्याने गोंधळ; जनावरांच्या बाजारात  अधिकारी – व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची 

जालना :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार, 3 जून रोजी सकाळी बोकडांचा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकार्‍यांमध्ये राडा झाला.  त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावे लागले.  

जालना :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवार, 3 जून रोजी सकाळी बोकडांचा बाजार भरविण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यावेळी व्यापारी आणि बाजार समितीच्या अधिकार्‍यांमध्ये राडा झाला.  त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावे लागले.  

      बकरी ईदला गोवंश हत्या टाळण्यासाठी राज्यभरात ३ ते ८ जून या काळात जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा राज्य गोसेवा आयोगाचा आदेश असताना  जालना  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी सकाळी 11 वाजता  बोकडांचा बाजार भरला. बाजारात मोठी जनावरे भलेही आली नाहीत. मात्र बोकडाच्या व शेळ्यांचा बाजार भरल्याने एकच गोंधळ उडाला. यावेळी 

 घटनास्थळी पोलीसांना पाचारण करावे लागले. बाजार समिती सचिव आणि पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.  

बकरी ईदनिमित्त बोकडांची खरेदी – विक्री करण्यासाठी नागरिकांनी बाजारामध्ये मोठी गर्दी केली होती. परंतु बोकड विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना बोकड माघारी घेऊन जाण्याच्या सूचना बाजार समितीच्या  वतीने करण्यात आल्या.  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ३ ते ८ जून दरम्यान कोणत्याही बाजार समितीत जनावरांचा बाजार भरणार नाही, याची जबाबदारी राज्य गोसेवा आयोगाने बाजार समिती सभपतींवर सोपवली होती. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीने  सांगितलेल्या कालावधीत जनावरांचा बाजार भरणार नाही, असे पत्रक देखील काढले होते. तरीही बाजार समितीत बोकडांचा बाजार भरल्याने गोंधळ उडाला. दरम्यान बोकडांचा बाजार भरवण्यात आल्याने व्यापारी आणि बाजार समिती प्रशासन यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top