dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

अकोल्यात माजी अभियंत्याची हत्या, जामिनावर झाली होती आरोपीची सुटका

अकोला : सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी अभियंता संजय कौसल यांच्या हत्येची थरारक घटना सोमवारी अकोल्यातली रणपीसे नगर परिसरात घडली. मृत संजक कौसल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे बंधू होते. आरोपी महेंद्र पवार हा जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आर्चित चांडक यांनी पदभार घेताच पहिल्याच आठवड्यात हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

महेंद्र पवार हा सराईत गुन्हेगार असून तो एका प्रकरणात तुरुंगात गेला होता. सध्या तो जामीनावर बाहेर होता. त्याने संजय कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार करत त्यांना जागीच ठार केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून पोलीसांचा त्या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, जुन्या वादातून हे हत्याकांड घडले असल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांनी आरोपी महेंद्र पवारला अटक केली आहे. संजय कौसल हे अकोल्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते विजय कौसल यांचे लहान बंधू आहेत. नवे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अकोल्यात रुजू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ही हत्या झाली आहे.

जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती

मारेकरी महेंद्र पवार याची पार्श्वभूमी ही गुंड प्रवृत्तीची असून त्याने या आधीही एका व्यक्तीवर गंभीर हल्ला केला होता. त्या प्रकरणात तो जामीनावर तुरुंगाबाहेर आला होता. मारेकरी महेंद्र पवार आणि मृत संजय कौसल हे रणपिसे नगरमधील मुरलीधर टॉवरमध्ये राहतात. एका जुन्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top