dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

मलकापूरात कारमध्ये सापडली १ कोटी ९७ लाख रुपयांची कॅश! 

मलकापूर :   एका कारमधून तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. २३ मे रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास मलकापूर पोलिसांनी  बोदवड नाक्याजवळ ही कारवाई केली. 

मलकापूर :   एका कारमधून तब्बल १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. २३ मे रोजी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास मलकापूर पोलिसांनी  बोदवड नाक्याजवळ ही कारवाई केली. 

मलकापूर बुलढाणा रोड वरून दोन व्यक्ती एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून बोदवड नाक्याजवळ एम एच २०, जिव्ही १७८१ ही गाडी अडवून पोलिसांनी तपासणी केली. त्यावेळी गाडीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. गाडीतील व्यक्तींना पैशाबाबत विचारणा केली असता त्यांना त्याबाबत व्यवस्थित उत्तर देता आले नाही. त्यामुळे सदर गाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तिथे शासकीय पंचांच्या साक्षीने स्टेट बँकेच्या कॅश मोजण्याच्या मशीन सह दोन अधिकाऱ्यांनी रक्कम मोजली असता ती १ कोटी ९७ लाख ५० हजार एवढी भरली. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिलेली आहे, सदर रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top