dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

लाहोर, इस्लामाबाद, सियालकोटवर हल्ला; भारताचा पाकिस्तानवर पुन्हा धमाका!

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न सुरु असतानाच भारताने मोठी लष्करी कारवाई केली आहे. भारताने लाहोर, सियालकोटसह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या तीन मोठ्या शहरांवर हल्ला केला आहे. या शहरांच्या दिशेने भारताने क्षेपणास्त्र हल्ला केला. 

नवी दिल्ली: पाकिस्तानकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न सुरु असतानाच भारताने मोठी लष्करी कारवाई केली आहे. भारताने लाहोर, सियालकोटसह पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या तीन मोठ्या शहरांवर हल्ला केला आहे. या शहरांच्या दिशेने भारताने क्षेपणास्त्र हल्ला केला. 

पाकिस्तानने गेल्या 24 तासांमध्ये भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व हल्ले भारताने निष्फळ ठरवले. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या लाहोर आणि इस्लमाबाद शहरामध्ये हल्ला करत जोरदार उत्तर दिले आहे. पाकिस्तानने  8 मे रोजी रात्री भारतीय सीमेवरील राज्यात अनेक भागात हल्ले केले आहेत. जम्मू ते गुजरातपर्यंत हे हल्ले करण्यात आले. हे हल्ले हमासच्या पद्धतीने करण्यात आल्याची माहिती आहे. भारतीय सैन्यानं हे हल्ले निष्फळ केले आहेत. या सर्व पार्श्वभूमीर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.

दोन JF- 17, एक F-16 पाडले

पाकिस्तानचे दोन JF- 17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती आहे. पाकिस्तानने रात्री भारताच्या 15 शहरांवर मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण हा प्रयत्न भारताने यशस्वी होऊ दिला नाही. S-400 एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तान हवाई हल्ला परतवून लावला. त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न सुद्धा भारताच्या सैन्यदलाने यशस्वी होऊ दिलेला नाही. पाकिस्तानने डागलेली ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात आली आहेत. भारतीय एअर डिफेंस सिस्टिमने जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर येथे पाकिस्तानचे हल्ले अयशस्वी केले आहेत. एअर डिफेन्स सिस्टिमसह एअर डिफेन्स गनने सुद्धा जम्मूत कमी उंचीवरुन उड्डणाऱ्या ड्रोन्सना नष्ट केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top