dainikmahabhoomi.com

📰 E-paper
Join Us
📰 E-paper
Join Us
LIVE:
Loading news...

Army vehicle falls into deep gorge : लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; पाच जवानांचा मृत्यू

Army vehicle falls into deep gorge : जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले.

Army vehicle falls into deep gorge

पुंछ :  जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी मोठा अपघात घडला आहे. जिल्ह्यातील मेंढर भागात लष्कराचे वाहन रस्ता चुकून दरीत कोसळले. या घटनेत अनेक जवान जखमी झाले. माहिती मिळताच लष्कराचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले अन् जखमी जवानांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान पाच जवानांची प्राणज्योत मालवली.

लष्कराच्या या वाहनात 8 ते 10 जवान होते, त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित जखमी जवानांवर उपचार सुरू आहेत. नीलम मुख्यालयाकडून बलनोई घोरा पोस्टकडे जाणारे 11 एमएलआयच्या लष्करी वाहनाचा घोरा पोस्टजवळ अपघात झाला. वाहन सुमारे 300-350 फूट खोल दरीत कोसळले. माहिती मिळताच 11 एमएलआयची क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top