Buldhana constituency vote counting: विधानसभा मतदारसंघात राजकीय प्रतिनिधीसह आता मतदारांची ही धाकधूक प्रचंड वाढली आहे. २१ व्या फेरीत जयश्री शेळके यांनी २५४ मतांची आघाडी घेतली आहे.
बुलढाणा : विधानसभा मतदारसंघात राजकीय प्रतिनिधीसह आता मतदारांची ही धाकधूक प्रचंड वाढली आहे. २१ व्या फेरीत जयश्री शेळके यांनी २५४ मतांची आघाडी घेतली आहे.
बुलढाणा विधानसभा मतदार संघाच्या लढतीचे चित्र संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पसरते आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महायुती शिंदे सेनेचे उमेदवार संजय गायकवाड आघाडीवर राहिले. मात्र,आता २१ व्या फेरीत जयश्री शेळके यांनी आघाडी घेतली. यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड धाकधूक वाढली असून, संपूर्ण जिल्हावसियांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.