Buldhana Polling: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांनी सपत्नीक केले मतदान

Buldhana Polling

Buldhana Polling: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या मादणी या गावी त्यांच्या पत्नी राजश्री जाधव यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला तर आमदार संजय रायमुलकर व त्यांच्या पत्नी रंजना रायमुलकर, मुलगी नयन, सून शाल्मली यांनी त्यांच्या नांद्रा धांडे या मूळ गावी मतदान केले.

Buldhana Polling
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सपत्नीक केले मतदान.

मेहकर ( जि. बुलढाणा ) : मेहकर विधानसभा क्षेत्रातील मेहकर व लोणार दोन्ही तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान सुरू आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी त्यांच्या मादणी या गावी त्यांच्या पत्नी राजश्री जाधव यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला तर आमदार संजय रायमुलकर व त्यांच्या पत्नी रंजना रायमुलकर, मुलगी नयन, सून शाल्मली यांनी त्यांच्या नांद्रा धांडे या मूळ गावी मतदान केले.

Buldhana Polling
आमदार संजय रायमुलकर यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क.

मतदार संघात तीन लाख मतदार असून आज सकाळी सात वाजेपासून ३५० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. मेहकर शहरातही शांततेत मतदान सुरू आहे. एकूण १९ उमेदवार निवडणूक रिंगणात असून आज मतदानाच्या दिवशी ते अनेक ठिकाणी मतदान केंद्रांना भेटी देत आहेत. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुलकर यांनीही आज सकाळपासून अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १५०० अधिकारी, कर्मचारी व ३८५ पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दलाचे पोलीस सुरक्षा व्यवस्था कडेकोट राहील याची काळजी घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »