18.14 percent polling in the state : राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.१४ टक्के मतदान, गडचिरोली जिल्हा आघाडीवर

18.14 percent polling in the state

18.14 percent polling in the state : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे.

18.14 percent polling in the state
अशोक चव्हाण यांनी कुटुंबासह बजावला मताधिकार

मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राज्यात सरासरी १८.१४ टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये राज्यात गडचिरोली जिल्हा मतदानात सर्वात पुढे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सकाळच्या सत्रात सुमारे 30 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान नांदेड जिल्ह्यातील १३.६७ टक्के आहे.

राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे…

अहमदनगर – १८.२४ टक्के,
अकोला – १६.३५ टक्के,
अमरावती – १७.४५ टक्के,
औरंगाबाद- १८.९८ टक्के,
बीड – १७.४१ टक्के,
भंडारा- १९.४४ टक्के,
बुलढाणा- १९.२३ टक्के,
चंद्रपूर- २१.५० टक्के,
धुळे – २०.११ टक्के,
गडचिरोली-३० टक्के,
गोंदिया – २३.३२ टक्के,
हिंगोली -१९.२० टक्के,
जळगाव – १५.६२ टक्के,
जालना- २१.२९ टक्के,
कोल्हापूर- २०.५९ टक्के,
लातूर १८.५५ टक्के,
मुंबई शहर- १५.७८ टक्के,
मुंबई उपनगर- १७.९९ टक्के,
नागपूर – १८.९० टक्के,
नांदेड – १३.६७ टक्के,
नंदुरबार- २१.६० टक्के,
नाशिक – १८.७१ टक्के,
उस्मानाबाद- १७.०७ टक्के,
पालघर-१९ .४० टक्के,
परभणी-१८.४९ टक्के,
पुणे – १५.६४ टक्के,
रायगड – २०.४० टक्के,
रत्नागिरी-२२.९३ टक्के,
सांगली – १८.५५ टक्के,
सातारा -१८.७२ टक्के,
सिंधुदुर्ग – २०.९१ टक्के,
सोलापूर – १५.६४,
ठाणे १६.६३ टक्के,
वर्धा – १८.८६ टक्के,
वाशिम – १६.२२ टक्के,
यवतमाळ -१६.३८ टक्के मतदान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »