Chhatrapati Sambhajinagar Crime : गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर शेंदूरवादा परिसरातील धामोरी बुद्रुक शिवारात सोमवार , १८ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञाताकडून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या गाडीवर शेंदूरवादा परिसरातील धामोरी बुद्रुक शिवारात सोमवार , १८ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञाताकडून त्यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. यात अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे व त्यांचे सहकारी लक्ष्मण डोळस हे गंभीर जखमी झाले. हा हल्ला नेमका कुणी व का केला याचा शोध पोलीस घेत आहे. जखमी झालेल्या सुरेश सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांना छत्रपती संभाजी नगर पुणे हायवे वरील एस एम एस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.घटनेची मिळतात पोलीस उपायुक्त नितीन बगाटे, सहायक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, राजेंद्र शहाणे , यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले. सध्या प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली.