Leopard terror continues in Jalgaon Shivara : जळगाव शिवारात बिबट्याची दहशत कायम;  दोन दिवसांपूर्वी घेतला होता शाळकरी मुलाचा जीव!

Leopard terror continues in Jalgaon Shivara

Leopard terror continues in Jalgaon Shivara : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान कापुस वेचत असलेल्या शाळकरी मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला करून बळी घेतला. या घटनेमुळे जळगाव शिवारात बिबट्याची दहशत वाढली आहे.

Leopard terror continues in Jalgaon Shivara

ढाकेफळ : पैठण तालुक्यातील ७४ जळगाव शिवारात बुधवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान कापुस वेचत असलेल्या शाळकरी मुलीवर बिबट्याने अचानक हल्ला करून बळी घेतला. या घटनेमुळे जळगाव शिवारात बिबट्याची दहशत वाढली आहे. दरम्यान या घटनेनंतर वनविभागाकडून जळगाव शिवारात दोन पिंजरे लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पैठण तालुक्यातील जळगांव शिवारात बुधवारी बिबट्याने कापूस वेचणाऱ्या मुलीवर हल्ला करून तिचा बळी घेतला. या नंतर दुसऱ्या दिवशी बिडकिन पोलिस ठाणे, महसुल विभाग व वनविभाग यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी उपाय योजना म्हणून दोन पिंजरे घटनास्थळी ठेवण्यात असून ते सायंकाळी सहा वाजेदरम्यान अँक्टिव करण्यात आले आहेत. त्या पिंजऱ्यात सावज म्हणून दोन मेंढरू ठेवण्यात आले असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
दहा ते पंधरा दिवसांत मयत मुलीच्या कुटुंबीयांना पंचवीस लाख रुपयांची मदत देण्यात येईल त्या पैकी दहा लाख रुपये तात्काळ व पंधरा लाख फिक्स डिपॉझिट करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक वन संरक्षक प्रदिप संकपाळ यांनी दिली.

दरम्यान ७४ जळगाव शिवारातील शेतात बिबट्याच्या हल्ल्यात १० वर्षीय मुलीचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतांनाच तोंडोळी येथील बाबासाहेब सखाराम तांबे दगडखाणी परिसरातील घरासमोर रात्री उशिरा बिबट्याने बकरीवर हल्ला करून बकरीचा फडशा पाडला असून संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक धास्तावलेले आहेत.
सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतीला रात्र पाळीचे भारनियमन बंद करून दिवस पाळीत लाईन देण्यात यावी अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.
ऑगस्ट महीन्यात मुलानी वाडगाव येथे बिबट्याने गायीवर हल्ला चढवला होता. तेव्हाच दिवसा वीज देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »