Chhatrapati Sambhajinagar news : विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरावर ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयाकडे आजघडीला १२ ड्रोन कॅमेरे असून या कॅमेऱ्यांसाठी १६ प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी दिली.
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या काळात शहरावर ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे. शहर पोलिस आयुक्तालयाकडे आजघडीला १२ ड्रोन कॅमेरे असून या कॅमेऱ्यांसाठी १६ प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांचे पथक सज्ज असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी बुधवार, ३० ऑक्टोबर रोजी दिली.
विधानसभा निवडणुकीची सध्या सर्वत्र धामधुम सुरु असून निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार राहणार याचे चित्र येत्या सोमवारी स्पष्ट होणार आहे. निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या निघणाऱ्या रॅली, मिरवणूका, नेत्यांच्या सभास्थळी, गर्दीच्या ठिकाणी, मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी शहर पोलिस आयुक्तालयाला १२ ड्रोन कॅमेरे मिळाले असून हे सर्व कॅमेरे उच्च क्षमतेचे असून ते रात्रीच्या अंधारातही काम करु शकतात असे सहाय्यक आयुक्त भुजंग यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तालयाला मिळालेले ड्रोन कॅमेरे चालविण्यासाठी पोलिस आयुक्त प्रविण पवार, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत स्वामी, गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली १६ कर्मचाऱ्यांना ड्रोन कॅमेरे चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग यांनी सांगितले.