Aurangabad Assembly Election: औरंगाबाद मध्यचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांची निवडणुकीतून माघार!

Aurangabad Assembly Election

Aurangabad Assembly Election: हिंदुत्ववादी मतं विभाजन टाकण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा औरंगाबाद मध्य चे उमेदवार माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारी केली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आ. प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून माजी आ. तनवाणी रिंगणात होते.

Aurangabad Assembly Election
किशनचंद तनवाणी

छत्रपती संभाजीनगर :  हिंदुत्ववादी मतं विभाजन टाकण्यासाठी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा औरंगाबाद मध्य चे उमेदवार माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी सोमवारी दि.२८ ऑक्टोबर रोजी दुपारी केली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आ. प्रदिप जैस्वाल यांच्या विरोधात शिवसेना उबाठा पक्षाकडून माजी आ. तनवाणी रिंगणात होते. त्यांच्या माघारीमुळे आता एमआयएमचे उमेदवार नासेर सिध्दीकी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर शिवसेना उबाठाकडून इच्छुक असलेल्या बाळासाहेब थोरात यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

Aurangabad Assembly Election

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून प्रदिप जैस्वाल तर भाजपाकडून किशनचंद तनवाणी अशा लढतीमुळे पहिल्यांदा शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा विजय झाला होता. २०१९ मध्ये किशनचंद तनवाणी यांनी प्रदिप जैस्वाल यांना पाठींबा दिल्याने ते निवडून येऊ शकले होते. आता शिवसेना शिंदेगटाकडून आ. प्रदिप जैस्वाल तर शिवसेना उबाठा पक्षाकडून माजी आ. किशनचंद तनवाणी अशी लढत होणे अपेक्षीत असतांना तनवाणी यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे शिवसेना उबाठा गटाला दुसरा उमेदवार द्यावा लागणार आहे. दुसरीकडे सुरूवातीपासून शिवसेना मध्य विधानसभा प्रमुख बाळासाहेब थोरात या मतदारसंघातून इच्छुक होते. माजी आ. तनवाणी यांच्या माघारीमुळे आता त्यांच्या उमेदवारीची शक्यता वाढली आहे.

पाठींबा नाही मतविभाजन टाळण्यासाठी माघार

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आ. प्रदिप जैस्वाल यांना पाठींबा देण्यासाठी आपण माघार घेतली नसून हिंदुत्ववादी मतं विभाजन टाकण्यासाठी माघार घेतली आहे. आम्ही दोघे एकमेकांविरूध्द लढलो असतो तर नक्कीच त्याचा एमआयएमच्या उमेदवाराला फायदा झाला असता अशी प्रतिक्रिया माजी आ. किशनचंद तनवाणी यांनी दिली.

…तर सिध्दीकी यांचा मार्गा मोकळा

शिवसेना उबाठा गटाकडून आता नव्या उमेदवाराचा शोध सुरू असून पक्षाने तो उमेदवार दिल्यास हिंदुत्ववादी मतांमध्ये नक्कीच विभाजन होणार आहे. याचा फायदा एमआयएममचे उमेदवार नासेर सिध्दीकी यांना होणार आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाकडून नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पहाणे उत्सुकतेचे आहे.

दानवे करणार पक्षाची भूमिका स्पष्ट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली असताना निवडणुकीतून माघार घेणाऱ्या माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्या भूमिकेवर पक्षाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आंबदास दानवे लवकरच मत मांडणार आहेत. ते काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »