Sharad Pawar’s NCP announces first list of 45 candidates: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बारामतीतून युगेंद्र पवार, तर सिंदखेड राजातून राजेंद्र शिंगणे यांच्या नावाची घोषणा

Sharad Pawar's NCP announces first list of 45 candidates

Sharad Pawar’s NCP announces first list of 45 candidates : महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Sharad Pawar's NCP announces first list of 45 candidates
राजेंद्र शिंगणे

पुणे :  महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ही पहिली यादी जाहीर केली आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बारामती येथून युगेंद्र पवार यांना संधी देण्यात आली आहे. तर सिंदखेड राजा मतदारसंघातून राजेंद्र शिंगणे यांची वाट मोकळी झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीतील उमेदवार

जयंत पाटील – इस्लामपूर
अनिल देशमुख- काटोल
राजेश टोपे- घनसावंगी
बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
शशिकांत शिंदे – कोरेगाव
जयप्रकाश दांडेगावकर- वसमत
गुलाबराव देवकर- जळगाव ग्रामीण
हर्षवर्धन पाटील- इंदापूर
प्राजक्त तनपुरे -राहुरी
अशोकराव पवार- शिरुर
मानसिंगराव नाईक- शिराळा
सुनील भुसारा- विक्रमगड
रोहित पवार- कर्जत जामखेड
विनायकराव पाटील- अहमदपूर
राजेंद्र शिंगणे- सिंदखेडराजा
सुधाकर भालेराव- उदगीर
चंद्रकांत दानवे- भोकरदन
चरण वाघमारे- तुमसर
प्रदीप नाईक- किनवट
विजय भांबळे-जिंतूर
पृथ्वीराज साठे- केज
संदीप नाईक- बेलापूर
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
दिलीप खोडपे- जामनेर
रोहिणी खडसे- मुक्ताईनगर
सम्राट डोंगरदिवे-मुर्तिजापूर
रविकांत बोपछे- तिरोडा
भाग्यश्री अत्राम- अहेरी
बबलू चौधरी- बदनापूर
सुभाष पवार- मुरबाड
राखी जाधव- घाटकोपर पूर्व
देवदत्त निकम- आंबेगाव
युगेंद्र पवार – बारामती
संदीप वर्पे- कोपरगाव
प्रताप ढाकणे- शेवगाव
राणी लंके- पारनेर
मेहबूब शेख- आष्टी
करमाळा-नारायण पाटील
महेश कोठे-सोलापूर शहर उत्तर
प्रशांत यादव- चिपळूण
समरजीत घाटगे – कागल
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
प्रशांत जगताप -हडपसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »