Chhatrapati Sambhajinagar news: विद्यापीठ कॅम्पसला नऊ दिवस सुट्टी

Chhatrapati Sambhajinagar news

Chhatrapati Sambhajinagar news :  डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसला २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळी दिवाळी सणानिमित्त नऊ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar news

छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कॅम्पसला २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळी दिवाळी सणानिमित्त नऊ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांनी गुरुवार, 24 ऑक्टोबर रोजी दिली.
गेल्या वर्षभरात इंद्रधनुष्य युवा महोत्सव, दीक्षांत समारंभ, नॅक पूर्वतयारी आदी कारणांमुळे पाच सुट्टया रद्द करण्यात आलेल्या होत्या. या संदर्भात मा.कुलगरु डॉ.विजय फुलारी यांच्या मान्यतेने बदली सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठाचा मुख्य परिसर २९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर या काळात बंद राहील. या काळी सर्व शैक्षणिक व प्रशासकीय विभाग देखील बंद असणार आहेत तर पदव्युत्तर विभागांना २७ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या काळात सुट्टी असणार आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे विद्यापीठ प्रशसानातर्फे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »