Earthquake in Nanded, Hingoli : नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Earthquake in Nanded, Hingoli

Earthquake in Nanded, Hingoli : नांदेडमध्ये मंगळवार  २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

Earthquake in Nanded, Hingoli

नांदेड : नांदेडमध्ये मंगळवार  २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ३.८ रिश्टर स्केलतीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. एनसीएसने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने एक्सवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, ‘नांदेड येथे आज सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली ५ किलोमीटर नोंदवण्यात आली. अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.’

महिनाभरापूर्वी अकोला, अमरावती जिल्ह्यांत भूकंप

यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी अमरावती जिल्ह्यात गेल्या महिन्यात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. चिखलदरा, धारणी, परतवाडा, अंजनगाव सुर्जी तसेच मेळघाटातील काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र अचलपूरपासून ४०० मीटर दूर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »