छत्रपती संभाजीनगर शहरात तरुणावर कोयत्याने हल्ला; जखमीवर उपचार सुरू

Chhatrapati Sambhajinagar Crime News

Chhatrapati Sambhajinagar Crime News :  जुन्या वादातून शहरातील जयभवानीनगर भागात एका चहाच्या हॉटेलमध्ये बसलेल्या तरूणावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने अचानक कोयत्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी दि. १५ ऑक्टोबर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली.

Chhatrapati Sambhajinagar Crime News

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून शहरातील जयभवानीनगर भागात एका चहाच्या हॉटेलमध्ये बसलेल्या तरूणावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने अचानक कोयत्याने हल्ला केला. ही घटना मंगळवारी दि. १५ ऑक्टोबर दुपारी पावणे तीनच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. क्षणार्धात परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली.

मागील काही दिवसापासून पुंडलिकनगर ते जयभवानीनगर रोड या परिसरात वारंवार शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारीच्या घटना घडत आहेत. दोन दिवसापूर्वी सायंकाळी याच भागात काही तरूणांमध्ये हाणामारी झाली. ही घटना ताजी असतांना मंगळवारी दुपारी अचानक तापडिया पार्कसमोर पुनम आर्केड येथे असलेल्या चहाच्या हॉटेलवर थाबलेल्या एका तरूणावर ईलेक्ट्रिक रिक्षातून आलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्यांने अचानक कोयते काढत हल्ला चढवला हल्लेखोरांनी सपासप चार ते पाच वार केल्याने अज्ञात तरूण रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळला. ओलख पाटण्याच्या आत हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर या हल्यात जखमी झालेल्या तरूणाला काहींनी खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान दहा ते पंधरा मिनिटानंतर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक आनंद बनसोडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या घटनेचा पंचनामा करून परिसरातील एका गुटखा विक्रेत्याला ताब्यात घेतले. हल्ला झालेल्या आणि हल्ला केलल्या तरूणांची नावे संध्याकाळ पर्यंत समोर येतील अशी माहिती पोलीस निरिक्षक बनसोडे यांनी दै.” महाभूमि ” ला बोलतांना दिली.

नियमांचा भंग होता कामा नये

मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून, संशयास्पद वाहतूक आणि बँक व्यवहारांवर नजर ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्ह्यात सर्वत्र पोलिस बंदोबस्त चोख ठेवून, आवश्यक मनुष्यबळाचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »