Chhattisgarh MLA in Chhatrapati Sambhajinagar : छत्तीसगड राज्यातील आमदार छत्रपती संभाजीनगरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : मागील काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकींमधील एक असलेल्या छत्तीसगड राज्यात सत्तापालट झाले होते. काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपाने सत्ता काबीज केली होती. मात्र, असे असताना मात्र, याच छत्तीसगड राज्यातील आमदार छत्रपती संभाजीनगरातील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असून, यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
छत्तीसगडचे काही आमदार शुक्रवारी रात्री अचानक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या आमदारांनी शहरातील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम केला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
या घडामोडींमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु यामुळे मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.