Jalna News: जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी चमन येथे गुरुवार 22 ऑगस्ट रोजी बारा वाजता राज्य सरकारविरोधात मटका फोड आंदोलन करण्यात आले.
जालना : जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीने शहरातील गांधी चमन येथे गुरुवार 22 ऑगस्ट रोजी बारा वाजता राज्य सरकारविरोधात मटका फोड आंदोलन करण्यात आले. बदलापूरमध्ये दोन चिमुरडीवर अत्याचार करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याने पालकांनी तीव्र आंदोलन केले होते. मात्र या आंदोलकांवरही पोलिसांनी लाठीचार्ज केला. शिवाय हे आंदोलन राजकीय पुरुस्कृत असल्याचेही सरकारने म्हटले होते. त्यामुळे राज्य सरकारविरोधात शहरातील गांधी चमन येथे महिला काँग्रेसच्या वतीने मटका फोड आंदोलन करण्यात आले. यासह गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे म्हणत नराधमाच्या फाशीचीही मागणी यावेळी आंदोलक महिला काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
यावेळी महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई पवार, तालुकाध्यक्षा इंदूबाई मैद, नंदा सांडू रगडे, अर्चना राऊत, रमा राठोड, मंदा विठ्ठल कांबळे, पद्मा भगवान रगडे, सुनिता ताराचंद पिपळे, आरती ज्ञानेश्वर कांबळे, ज्योती गजानन कांबळे, खैरूनिसा सय्यद, विभा लांखे, रूख्मन नाना कांबळे, उज्ज्वला कचरु मगरे, दीक्षा विजय रगडे, विमल लक्ष्मण धोत्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.