Firing in Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाळूजच्या वडगाव कोल्हाटी भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवार 19 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. वाळूजच्या वडगाव कोल्हाटी भागात एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवार 19 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आली आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कपिलच्या छातीत गोळ्या घालून आरोपी बंदूक घटना स्थळावरून पसार झाले आहेत. उत्तरीय तपाणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोनि कृष्णा शिंदे, फौजदार संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार विकास वैष्णव, विशेष शाखेचे योगेश शेळके, विक्रम वाघ, राजेभाऊ कोल्हे, बाळासाहेब आंधळे, डिबी पथकाचे विनोद नितनवरे, फौजदार मनोज शिंदे आदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना घटनास्थळी एक गावठी कट्टा आणि गोळी झाडल्यानंतर रिकामे राहिलेले एक काडतूस आढळून आले.
मृत तरुणांची पोलिसांनी ओळख पटवली असता त्याचे नाव कपिल पिंगळे असून तो रांजणगावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खात्री करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ त्याच्या नातेवाईकांची संपर्क साधला असता, कपिलच्या वडिलांनी घटनास्थळी येऊन पाणी केली असता तो आपला मुलगा कपिलच असल्याचे वडिलांनी पोलिसांना सांगितले.