Jalna accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात सात जण ठार

Jalna accident

Jalna accident: समृद्धी महामार्गावर जालना येथून जवळच असलेल्या कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात सात जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. ही घटना २८ जुन रोजी रात्री १०.४८ वाजताच्या सुमारास घडली.

Jalna accident
Jalna accident

अंबड (जि.जालना) : समृद्धी महामार्गावर जालना येथून जवळच असलेल्या कडवंची गावाजवळ दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातात सात जण जागीच ठार झाले, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. ही घटना २८ जुन रोजी रात्री १०.४८ वाजताच्या सुमारास घडली. जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून मृतकांची ओळख अद्याप पडली नाही.
प्राप्त माहितीनुसार, एमएच १२ एमएफ १८५६ आणि एमएच ४७ बीपी ५४७८ क्रमांकाच्या कार कडवंची जवळील ३५१/३०० पाँईंटवर समोरासमोर एकमेकांना धडकल्या. या भिषण अपघातात दोन्ही वाहनातील एकूण जात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींना समृद्धी महामार्ग रुग्णवाहिका सिंदखेडराजा व जालना रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालय जालना येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. मृतकांमध्ये फैयाज मन्सुरी, फजल शकील मन्सुरी, अल्ताफ मंसूरी (सर्व रा. मुंबई), प्रदीप मिसाळ व इतर दोन(रा. पिंपळगाव बुद्रुक ता. देऊळगाव) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

बॅरिकेट्स तोडून कार रस्त्याखाली

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाजवळ हा अपघात घडला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील एर्टिका गाडी ही नागपूरवरुन मुंबईच्या दिशेने जात होती. याचदरम्यान स्विफ्ट डिझायर गाडी डिझेल भरुन राँग साईडने येत असताना हा भीषण अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, एर्टिका गाडी ही या महामार्गाचे बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या 4 ते 5 फूट खाली कोसळली. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले.

मृतकांची ओळख पटविण्याचे काम सुरू

रात्रीच्या वेळी हा अपघात घडल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि इतर मदतकार्य घटनास्थळी पोहचायला उशीर झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. पोलीस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »