Prataprao Jadhav’s nomination as a Union Minister : खा. प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रिपदी वर्णी

प्रतापराव जाधव

Prataprao Jadhav’s nomination as a Union Minister : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. मोदी यांच्यासोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये बुलढाण्यातून शिवसेना शिंदे गटाचे खा प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली आहे. शपथविधीच्या संदर्भात त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याची माहिती आहे.

प्रतापराव जाधव
प्रतापराव जाधव

बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत. मोदी यांच्यासोबत 18 खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये बुलढाण्यातून शिवसेना शिंदे गटाचे खा प्रतापराव जाधव यांची वर्णी लागली आहे. शपथविधीच्या संदर्भात त्यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आल्याची माहिती आहे.

येत्या ९ जूनला सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला जगभरातील पाहुण्यांसह ९००० जण उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती भवनात संध्याकाळी पंतप्रधान आणि काही कॅबिनेट मंत्री शपथ घेतील. या सोहळ्यासाठी बांग्लादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशससह अन्य देशातील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. मोदी तिसऱ्यांदा शपथ घेण्यापूर्वी त्यांच्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच मंत्रिमंडळात समाविष्ट केल्या जाणाऱ्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यानुसार, यात काही माजी मंत्री आणि नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. घटक पक्षातील टीडीपी, जेडीयू, आरएलडी, शिवसेना, राष्ट्रवादी, अपना दल, एलजेपी पक्षातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात यंदा भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे घटक पक्षांना सोबत घेत भाजपाला सरकार चालवावे लागणार आहे. एनडीएत कोणाला कोणती खाती देणार? याबाबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या घरी बैठकही पार पडली आहे.

 

नेहरूंनंतर मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

मोदींच्या मंत्रिमंडळात भाजपाचे हे नेते बनू शकतात मंत्री

नव्या मंत्रिमंडळात भाजपाकडून राजनाथ सिंह, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, एस जयशंकर, महेश शर्मा, एसपी सिंह बघेल, अनुराग ठाकूर, पीयूष गोयल, मनसुख मंडाविया, नित्यानंद राय, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत, राजीव प्रताप रुडी, शिवराज सिंह चौहान यांची नावे आघाडीवर आहेत. त्याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे, वीरेंद्र कुमार खटीक, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव, सुरेश गोपी, विप्लब देब, सर्वानंद सोनेवाल, प्रल्हाद जोशी, शोभा करंदजले, पीसी मोहन, नारायण राणे, श्रीपाद नाईक यांचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »