Maharashtra Lok Sabha Election 2024 Result Marathwada: राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली राखीव मतदार संघ म्हणून लातूर लोकसभेच्या जागेकडे पाहिले जाते. काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि भाजपचे दुसऱ्या वेळेस संधी मिळालेले खासदार सुधाकर शृंगारे यांच्यात दुरंगी लढत होती. परंतु, आता इथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. सीटींग एमपी असलेले शृंगारे यांना आपला गड राखता आलेला नाही.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेली राखीव मतदार संघ म्हणून लातूर लोकसभेच्या जागेकडे पाहिले जाते. काँग्रेसचे डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि भाजपचे दुसऱ्या वेळेस संधी मिळालेले खासदार सुधाकर शृंगारे यांच्यात दुरंगी लढत होती. परंतु, आता इथे भाजपाला मोठा धक्का बसला आहे. सीटींग एमपी असलेले शृंगारे यांना आपला गड राखता आलेला नाही. काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव काळगे यांचा विजय झाला आहे
डॉ. शिवाजीराव काळगे यांना 3 लाख 80 हजार 851 यांना मते मिळाली असून, त्यांना भाजपाचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या तुलनेत 39 हजार 750 मतांची लीड आहे. ही लीड बघता काळगेंचा विजय निश्चित मानल्या जात आहे.
बीडची मतमोजणी थांबवली
बीडमध्ये ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने तेथील मतमोजणी थांबविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.