Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्षाच्या (एसपी) तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्रभावशाली यादव कुटुंबातील पाच सदस्यांपैकी अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्यासह चार उमेदवार मोठ्या फरकाने आतापर्यंत आघाडीवर आहेत.
लखनौ : लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधून समाजवादी पक्षाच्या (एसपी) तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्रभावशाली यादव कुटुंबातील पाच सदस्यांपैकी अखिलेश यादव आणि त्यांची पत्नी डिंपल यादव यांच्यासह चार उमेदवार मोठ्या फरकाने आतापर्यंत आघाडीवर आहेत.
निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कन्नौजमध्ये अखिलेश यादव हे भाजपच्या सुब्रत पाठक यांच्यापेक्षा 61,351 मतांनी पुढे आहेत, तर मैनपुरीमध्ये डिंपल यादव भाजपच्या जयवीर सिंह यांच्यापेक्षा 68,261 मतांनी पुढे आहेत. आझमगडमध्ये सपाचे धर्मेंद्र यादव हे भाजपचे दिनेश लाल यादव निरहुआ यांच्यावर ४५,०६९ मतांनी आणि फिरोजाबादमध्ये पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादव भाजपच्या विश्वदीप सिंह यांच्यापेक्षा ५६,९८६ मतांनी पुढे आहेत. मात्र, बदायूंमध्ये सपा नेते शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव हे भाजपच्या दुर्विजय सिंह शाक्य यांच्यापेक्षा 16,751 मतांनी पिछाडीवर आहेत. या जागेवर पक्षाने आधी शिवपाल यांना तिकीट दिले होते, मात्र नंतर त्यांचा मुलगा आदित्य यांना तिकीट देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजप नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव यांच्या कुटुंबीयांना तिकीट दिल्याचा आरोप केला होता.