Kabirdham Road Accident : पिकअप वाहन खड्ड्यात पडले, 15 जणांचा मृत्यू

पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने 15 जणांचा मृत्यू

Kabirdham Road Accident : छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात सोमवारी पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने 14 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.

पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने 15 जणांचा मृत्यू
पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने 15 जणांचा मृत्यू

कावर्धा : छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात सोमवारी पिकअप वाहन खड्ड्यात पडल्याने 14 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले.
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील कुकडूर पोलिस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ हा अपघात झाला. त्यांनी सांगितले की, कुई गावात राहणारे ग्रामस्थ तेंदूपत्ता काढण्यासाठी गेले होते आणि ते पिकअप वाहनाने आपल्या गावी परतत असताना बहपनी गावाजवळ वाहन खड्ड्यात पडले, त्यामुळे गाडीतील १५ जणांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पाठवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »