Lok Sabha Election 2024: ही माझी शेवटची निवडणूक – चंद्रकांत खैरे

चंद्रकांत खैरे

Lok Sabha Election 2024: महविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे मोठे वक्तव्य केले.

चंद्रकांत खैरे
चंद्रकांत खैरे

छत्रपती संभाजीनगर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. याच दरम्यान महविकास आघाडीचे उमेदवार तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे मोठे वक्तव्य केले.
मतदान झाल्यानंतर खैरे म्हणाले की, ही माझी निवडणूक लढवायची सहावी वेळ आहे. त्यामुळे ही निवडणूक माझी अखेरची निवडणूक असणार आहे. त्यानंतर इतर जे तयार झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत. त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची संधी मिळायला हवी, असे वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा कसा आणि कितपत परिणाम होतो हे निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

विकासाची दिशा माझ्याकडे

पुढे बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, लोकांनी ही निवडणूक त्यांच्या हाती घेतली आहे. 20 वर्षांत मी हे शहर शांत ठेवले होते. आणि पुढच्या टर्ममध्ये विकासाची दिशा माझ्याकडे आहे. दारूचे दुकान सुरू करणारे उमेदवार माझ्या विरोधात उभे आहेत, असा टोला त्यांनी यावेळी संदीपान भुमरे यांना लगावला आहे.

भुमरेंनी केले मूळ गावी मतदान

पैठण तालुक्यातील मूळ पाचोड या गावी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदानाचा हक्क बजवला.

सतीश चव्हाण, संजय शिरसाटांसह अतुल सावेंनीही बजावला मतदानाचा हक्क

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असून, महायुतीच्या उमेदवारांसह महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि सोबतच भाजपाचे आमदार अतुल सावे यांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »