Blast in firecrackers factory: शिवकाशी येथील फटाक्यांच्या कारखान्याला गुरुवारी लागलेल्या आगीत पाच महिलांसह सात कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.
विरुधुनगर (तामिळनाडू) : शिवकाशी येथील फटाक्यांच्या कारखान्याला गुरुवारी लागलेल्या आगीत पाच महिलांसह सात कामगारांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले.
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींना शिवकाशी येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींमध्ये एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीजवळील सेंगमलापट्टी येथील खाजगी फटाक्यांच्या कारखान्यात सुमारे 10 कर्मचारी काम करत असताना दुपारच्या सुमारास स्फोट झाला, असे त्यांनी सांगितले.