Buldhana news: भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा युवक जखमी झाला.
बुलढाणा : भरधाव दुचाकी समोरून येणाऱ्या एसटी बसवर आदळली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला तर दुसरा युवक जखमी झाला. ही घटना 9 मे रोजी मोताळा – बुलढाणा रस्त्यावर मूर्ती फाट्यावर दुपारी 2 वाजे दरम्यान घडली.अपघातातील मृतकाचे नाव वैभव समाधान गणगे असून तो कोथळी येथील रहिवासी आहे.
एका लग्न कार्यक्रमासाठी वैभव आणि त्याचा मित्र दुचाकी क्रमांक एमएच 19 बीए 1287 वरून जात होते. दरम्यान मूर्ती फाट्यावर मलकापूरकडे जात असलेल्या बसवर त्यांची दुचाकी धडकली. या अपधातात दुचाकीवर मागे बसलेला राजू सुधाकर बावणे हा गंभीर जखमी झाला. सदर एसटी बस मेहकरवरून भुसावळकडे चालली होती.