Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar: खुनाच्या दोन घटना; छत्रपती संभाजीनगर हादरले

Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar

Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar : शहरात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली. हडको आणि ईटखेडा परिसरात या घटना घडल्या. हडको नवजीवन कॉलनी परिसरात एका तरूणाला तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत ठार करण्यात आले. ही घडना 4 मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ जॉगिंग ट्रॅकवर घडली. तर दुसरी घटना ईटखेडा येथे शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान घडली.

Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar
Two cases of murder in Chhatrapati Sambhajinagar

छत्रपती संभाजीनगर : शहरात झालेल्या दोन खुनाच्या घटनांनी खळबळ उडाली. हडको आणि ईटखेडा परिसरात या घटना घडल्या. हडको नवजीवन कॉलनी परिसरात एका तरूणाला तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करीत ठार करण्यात आले. ही घडना 4 मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव रोडवरील प्रमोद महाजन क्रीडा संकुलाजवळ जॉगिंग ट्रॅकवर घडली. तर दुसरी घटना ईटखेडा येथे शुक्रवारी मध्यरात्री दरम्यान घडली. एका टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला. सातारा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
हडको भागात घडलेल्या घटनेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला पाहून नागरिकांनी सिडको पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर सिडको ठाण्याचे पोलीस निरीक्षक अतूल येरमे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारपर्यंत मृतकाची ओळख पटली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »