Crime news Chhatrapati Sambhajinagar: शहरातील एका महिलेस लग्नाचे आमिष देऊन आरोपीने सतत तीन वर्ष लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील एका महिलेस लग्नाचे आमिष देऊन आरोपीने सतत तीन वर्ष लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये महिलेने तक्रार दिली की, आरोपी तानाजी साहेबराव ओळेकर (रा.तळणी, जि.जालना) यांने लग्नाचे आमिष दिले. एवढेच नव्हे तर फिर्यादी महिलेच्या मुलीचा सांभाळ करेन असे आमिष देऊन विश्वास जिंकला. आरोपींने 1 जानेवारी 2020 ते 6 मार्च 2023 पर्यंत तब्बल तीन वर्ष महिलेचे शारिरीक शोषण केले. परंतु लग्न केले नाही. याप्रकरणाची वाच्यता पोलीस स्टेशन आणि इतर ठिकाणी केल्यास फिर्यादी महिलेचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
गर्भपातही केला
आरोपीकडून फिर्यादी महिलेला दिवस गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपातही केल्याचेही तक्रारीत नमुद आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.