Lok Sabha Elections: खैरे सोमवारी तर बुधवारी दाखल करणार जलील उमेदवारी अर्ज

चंद्रकांत खैरे

Lok Sabha Elections: छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची रंग येत्या आठवड्यापासून वाढणार आहे. कारण, सोमवारपासून तगडे उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे.

इम्तियाज जलील
इम्तियाज जलील

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीची रंग येत्या आठवड्यापासून वाढणार आहे. कारण, सोमवारपासून तगडे उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन्ही शिवसेनेच्या विरोधात खासदार इम्तियाज जलील २४ एप्रिल रोजी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरामध्ये राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. अशातच एमआयएम पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील उमेदवार खासदार इम्तियाज जलील हे 24 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शहरात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सोमवारी दाखल करणार खैरे उमेदवारी अर्ज

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे सोमवार 22 एप्रिल रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिंदेसेनेचे उमेदवार संदीपान भुमरे हे येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

जलील यांच्यावर 12 गुन्हे

खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर असलेल्या खटल्यांविषयीही यावेळी माहिती दिली. राजकारणात येण्यापूर्वी माझ्याविरोधात एकही केस नव्हती. गेल्या 10 वर्षांत माझ्याविरोधात 12 केसेस झाल्या. माझ्यावर चालू असलेल्या खटल्यांची माहिती लोकांना समजावी म्हणून मी ही माहिती देत असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »