Naxal activities: चार महिन्यांत छत्तीसगडमध्ये 80 नक्षलवादी ठार

Encounter in Sukma, Chhattisgarh; 10 Naxalites killed

Naxal activities: छत्तीसगडमध्ये या वर्षात आतापर्यंत किमान 80 नक्षलवादी ठार झाले असून 125 हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 150 जणांनी आत्मसमर्पण केले आहे, अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

चार महिन्यांत छत्तीसगडमध्ये 80 नक्षलवादी ठार
चार महिन्यांत छत्तीसगडमध्ये 80 नक्षलवादी ठार

नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये या वर्षात आतापर्यंत किमान 80 नक्षलवादी ठार झाले असून 125 हून अधिक नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 150 जणांनी आत्मसमर्पण केले आहे, अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
दोन दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2004-14 च्या तुलनेत 2014-23 मध्ये देशात डाव्या विचारसरणीशी संबंधित हिंसाचारात 52 टक्के घट झाली आहे आणि या कालावधीत मृत्यूची संख्या 6,035 वरून 69 टक्क्यांनी घसरून 1,868 वर आली आहे. डिसेंबर 2023 मध्ये विष्णू देव साईंचे सरकार स्थापन झाल्यापासून छत्तीसगडमध्ये सक्रिय कारवाया करण्यात आल्या आहेत आणि जानेवारीपासून आतापर्यंत किमान 80 नक्षलवादी मारले गेले आहेत आणि 125 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 150 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

माओवाद्यांविरुद्ध सक्रियपणे ऑपरेशन

गेल्या वर्षीच्या उत्तरार्धात, नक्षलग्रस्त राज्यांमधील सुरक्षा परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतल्यानंतर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांना माओवाद्यांविरुद्ध सक्रियपणे ऑपरेशन करण्याचे निर्देश दिले होते. मंगळवारी, छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राज्यातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या चकमकीत काही वरिष्ठ सदस्यांसह 29 नक्षलवादी ठार केले. मंगळवारच्या चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची संख्या ही डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी विरुद्ध छत्तीसगडच्या लढाईच्या इतिहासातील एका चकमकीत आतापर्यंतची सर्वाधिक आहे.

डाव्या विचारसरणीच्या घटना झाल्या कमी

गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2004-14 च्या तुलनेत 2014-23 मध्ये डाव्या विचारसरणीच्या घटना 14,862 वरून 7,128 पर्यंत कमी झाल्या आहेत. यानुसार, डाव्या विचारसरणीच्या अतिरेकांमुळे सुरक्षा जवानांच्या मृत्यूची संख्या 2004-14 मधील 1,750 वरून 2014-23 मध्ये 72 टक्क्यांनी घटून 485 वर आली आहे. याच कालावधीत नागरिकांच्या मृत्यूची संख्या 4,285 वरून 68 टक्क्यांनी घसरून 1,383 वर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »