The principal molested the student: शिक्षकी पेशाला छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेच्या मुख्यध्यापकाने काळीमा फासला आहे. मुख्यध्यापकाने चक्क विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी मुख्यध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर : आई-वडिलानंतर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यात मोलाची भूमिका वठवतात. मात्र, या शिक्षकी पेशाला छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेच्या मुख्यध्यापकाने काळीमा फासला आहे. मुख्यध्यापकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना शहरातील एका शाळेत घडली आहे.याप्रकरणी आरोपी मुख्यध्यापकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या मावशीने जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, त्यांच्या बहिणीची मुलगी शहरातील एका नामांकित शाळेमध्ये असता सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाळेचे मुख्याध्यापक याने त्या अल्पवयीन मुलीस बाथरुमच्या बाजुच्या वर्गामध्ये बोलवून तिचा विनयभंग केला. या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी मुख्यध्यापकाविरुद्ध जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राऊत करत आहेत.