Rigorous imprisonment for both: मजूरांना मारहाण करणाऱ्या दोघांना सश्रम कारावास

Rigorous imprisonment for both

Rigorous imprisonment for both: मजुरांना मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना देऊळगावराजा दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हे सिद्ध झाल्याने मुख्य न्यायाधीश शैलेश कंठे यांनी दोन्ही आरोपींना एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला.

Rigorous imprisonment for both
Rigorous imprisonment for both

देऊळगांव राजा (जि. बुलढाणा) : मजुरांना मारहाण करणाऱ्या दोन आरोपींना देऊळगावराजा दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हे सिद्ध झाल्याने मुख्य न्यायाधीश शैलेश कंठे यांनी दोन्ही आरोपींना एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला. ही घटना १९ डिसेंबर २०१९ रोजी घडली असून या प्रकरणी कंकाळ यांनी सिंदखेडराजा पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार, देऊळगावराजा – सिंदखेडराजा मार्गाच्या रुंदीकरण कामावर कंकाळ व त्यांचे सहकारी सुनील सुतार हे दोघ २९ डीसेंबर २०१९ रोजी मजुर म्हणून काम करत होते. दरम्यान वनराई हाॅटेलनजीक समाधान विनायक शेरे आणि सुनील परसाराम उजाड हे दोघे मोटारसायकलने आले व त्यांनी जे.सि.बी चालक सुनील सुतार यांना काम बंद करा, असे सांगत जेसिबीची चाबी हिसकावून घेतली. दोन्ही आरोपींनी सुनील सुतार यांना मारहाण केली. समाधान शेरे याने कंकाळ यांना जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. जखमी कंकाळ यांनी सिंदखेड राजा पोलीस स्टेशन गाठत समाधान शेरे, सुनील उजाड या दोघांविरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. हेड काँस्टेबल अरुण मोहिते यांनी गुन्ह्याचा तपास करुन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. पक्षातर्फे वि.सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल शेषनारायण शेळके यांनी मा.सर्वोच्च न्यायालयाचे न्याय निवाडे दाखल करून भरीव युक्तीवाद केला. अंतिम युक्तीवाद मा.दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शैलेश कंठे यांनी ग्राह्य धरून आरोपीस दोषी ठरविले. आरोपी समाधान शेरे व सुनील उजाड यांना प्रत्येकी एक वर्ष सश्रम करावास व प्रत्येकी पाच हजार दंडाची शिक्षा सुनावली. तसेच तीन महिन्याची साध्या कारवासाची कैद व प्रत्येकी एक हजार दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षा तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अनिल शेळके यांनी कामकाज बघितले तर कोर्ट पैरवी म्हणून पो.हे.कॉ.सुरेश गवई, ना.पो.का.जयश्री दंदाले यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »