Husband killed in app collision; Wife serious: ॲपेच्या धडकेत पती ठार; पत्नी गंभीर

क्षतिग्रस्त झालेली दुचाकी
Husband killed in app collision; Wife serious: तालुक्यातील झाडेगाव रोडवर एका भरधाव मालवाहू ॲपेने दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार सुरेंद्र विश्वनाध पागृत (रा.पोफळी ता.मोताळा) हे जागीच ठार, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार २ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.
ज.जामोद (जि.बुलढाणा): भरधाव मालवाहू ॲपेने दुचाकीला जबर धडक दिली, या धडकेत मोताळा तालुक्यातील पोफळी येथील 50 वर्षीय दुचाकीस्वार सुरेंद्र विश्वनाथ पागृत हे जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी विद्या पागृत ह्या गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवार 2 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास झाडेगाव रोडवर घडली. ॲपे चालक घटनास्थवरुन फरार झाला.
मोताळा तालुक्यातील पोफळी येथील सुरेंद्र विश्वनाथ पागृत (वय 50) हे त्यांच्या पत्नी सौ. विद्या सुरेंद्र पागृत (वय 45) हे दोघे मंगळवार 2 एप्रिल रोजी सकाळी आपल्या दुचाकी क्र.एम.एच-28 पी-1153 ने जळगाव जामोद येथे नातेवाईकांकडे जात होते, दरम्यान ज.जामोद तालुक्यातील झाडेगाव येथे बकऱ्यांना घेवून जाणाऱ्या भरधाव एम.एच.48 टी.2139 या ॲपेने दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भिषण होती की, दुचाकीवरील सुरेंद्र पागृत व त्यांची पत्नी विद्या पागृत गंभीर जखमी झाल्या.  त्यांना स्थानिकांनी खामगाव येथे सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविले. यावेळी उपचारा दरम्यान सुरेंद्र पागृत यांचा मृत्यू झाला. विद्या पागृत ह्या गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »