Archana Patil joins BJP:लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फोडाफोडाच्या राजकारणाने जोर धरला आहे. यामध्येच आज 30 मार्च रोजी मराठवाड्यातील लातूरमध्ये काँग्रेसमध्ये मोठा धक्का देण्यास भाजपा यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फोडाफोडाच्या राजकारणाने जोर धरला आहे. यामध्येच आज 30 मार्च रोजी मराठवाड्यातील लातूरमध्ये काँग्रेसमध्ये मोठा धक्का देण्यास भाजपा यशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. कारण, काँग्रेसचे नेते शिवराज चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित अर्चना पाटील यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला.
राजेश नितुरे यांचाही भाजपामध्ये प्रवेश
भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी काँग्रेसचे बडे नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून अर्चना पाटील आणि उदगीरचे सातवेळा नगराध्यक्ष असलेले राजेश नितुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
…तर मानहानीचा दावा ठोकणार- दानवे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. त्यामुळे नाराज असलेले दानवे पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गट किंवा भाजपात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात होते. परंतु, याबाबतचे स्पष्टीकरण देत अंबादास दानवे यांनी सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम लावला आहे. तर, त्यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे अंबादास दानवे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.