छत्रपती संभाजीनगर : शहरातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सवलतीच्या दरात सुरू असलेल्या गुंठेवारी नियमितीकरण योजनेची मुदत ३१ डिसेंबर रोजी पर्यंत वाढवून द्यावी, अशी मागणी अमान विश्व मद्दगार संघ समितीने केली आहे. मुदतवाढ न मिळाल्याने गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण समितीचे अध्यक्ष कलीम सलीम पटेल यांनी सुरू केले आहे.

यासंदर्भात महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त आणि मुख्य नगररचना अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शहरातील व्यापार-व्यवसायावर परिणाम झाला असून, मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांसमोरही आर्थिक संकट उभे राहिले आहे. अनेक कुटुंबांना दैनंदिन खर्च भागविणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत गुंठेवारी नियमितीकरणासाठी नागरिकांना आणखी किमान दोन महिन्यांची मुदत मिळाल्यास दिलासा मिळू शकतो.
शहरातील नागरिक गुंठेवारी नियमितीकरणासाठी प्रतिसाद देत असून, मुदतवाढ मिळाल्यास अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचवून त्यांना नियमितीकरणासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, अशी ग्वाही समितीने दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन मुदतवाढीचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. महापौर समीर राजूरकर यांना देण्यात आलेल्या निवेदनावर
– कलीम सलीम पटेल, आमेर पाशा खान आणि शहरातील नागरिकांच्या सह्या आहेत.